नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
पेडकाई शिक्षण संस्था साकोरा येथे इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी व ‘नासा अँक्वा साकोरेचे युवा उद्योजक नरेद्र बोरसे,तसेच पालक प्रतिनिधी योगेश वाघ हे उपस्थित होते. पेडकाई शिक्षण संस्था मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.नरेद्र बोरसे यांनी “गुरु अनुभवातून उलगडतो” या विचारातून मार्गदर्शन करत शाळेला स्पीकर सेट भेट देण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांनी मनोगताद्वारे गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सूत्रसंचालन अनन्या बोरसे हिने तर आभार समृद्धी व अर्पिता यांनी मानले.