अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यातील वडखळ पोयनाड दरम्यान असणाऱ्या रस्त्यालगत अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथील हॉटेल पाटील ब्रदर्स या ठिकाणी एक हजार सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी कोणत्याही प्रकारची शासकीय विभागाची परवानगी न घेता जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच या विवाह सोहळ्याप्रसंगी सचिन यशंवत लोभी,जिवीता सचिन लोभी (रा.वांघजई पोयनाड ता.अलिबाग, जिल्हा रायगड) या पती पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी ईश्वर नाईक,महादेव लेडी,अर्जुन गोपाल नाईक,सुनिल अंकुश वाघे,सुमित राजेश नाईक,रोशन नरेश वाघे,कैलास चंद्रकांत नाईक, कैलास चंद्रकांत नाईक याचा मामा पुर्ण नाव माहीत नाही(सर्व रा.करंजाडे ता. पनवेल जि. रायगड) या आठ जणांविरोधात राकेश यशवंत मेहतर(पोहवा/२३१८ वय -३९ वर्ष, पोयनाड,जि.रायगड ) यांनी पोयनाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
रायगड जिल्ह्यातील वडखळ पोयनाड दरम्यान असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथील हॉटेल पाटील ब्रदर्स येथे एक हजार जोडप्यांचा सामूहिक पद्धतीने लग्न सोहळा आयोजित केला होता.सदर आयोजकांनी जिल्हाधिकारी रायगड यांचे जमावबंदीचे आदेश असताना देखील कोणतीही परवानगी न घेता सोहळ्याचे आयोजन केल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहळ्याठिकाणी सचिन यशंवत लोभी यांना दमदाटी, शिवीगाळ करीत कानफटात मारली तसेच पत्नी जिवीता सचिन लोभी यांना धक्का बुक्की करीत मारहाण केल्या प्रकरणी ईश्वर नाईक,महादेव लेडी,अर्जुन गोपाल नाईक,सुनिल अंकुश वाघे,सुमित राजेश नाईक,रोशन नरेश वाघे,कैलास चंद्रकांत नाईक, कैलास चंद्रकांत नाईक याचा मामा या आठ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोयनाड येथे आयोजित केलेल्या सामूहिक लग्नसोहळ्याला रायगड जिल्ह्यातून जवळपास तीन ते चार हजार लोक उपस्थित होते. मात्र, तेथे आलेल्या सर्व वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था अपुरी असल्यामुळे सर्व गाड्या रोडवर लागून वाहतूक कोंडी झाली होती. पेण, अलिबाग हा महामार्ग अरुंद असल्यामुळे येणारे पर्यटक व कार्यक्रमासाठी उपस्थित महिलावर्ग, पुरुषवर्ग, त्यातच रविवार असल्याने मुरुड जंजिरा, अलिबागकडे येणाऱ्या व जाणाऱ्या पर्यटकांना या ट्राफिकमुळे आपला अमूल्य वेळ खर्च करावा लागला.
पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अंकुश सांगडे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्षरित्या पाहणी करून ट्राफिक ए. एस. आय. पवार, ए. एस. आय. भगत, पोलीस हवालदार सतीश पाटील यांची नियुक्ती करून ट्रॅफिक नियंत्रणात आणण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं त्याना भेटून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. मात्र, आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याने आयोजकांवर पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आला आहे. तसेच विवाह सोहळ्यामध्ये भांडण झाल्याप्रकरणी आठ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोयनाड पोलिस यांच्याकडून देण्यात आली आहे.
याबाबत पोयनाड पोलीस ठाणे कलम भारतीय न्याय संहिता कलम 69 सह बालकांचे लैगिंक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4ए6 प्रमाणे 115(2),189(2),191(2), 190(2),352 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अशोक मरस्कोले हे करीत आहेत.