माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
गेल्या काही महिन्यापासून तटकरे आणि गोगावले यांच्यात वाद दिसू लागला.एकमेकांवर शाब्दिक वार करण्यापासून ते जिल्ह्यातील राजकीय योजनामध्ये पाय ओढण्यापर्यंत ही लढाई टोकाला गेली…या संघर्षाची झळ जिल्हास्तरीय एकात्मतेवर पडत असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही पक्षांमध्ये भिंत उभी राहिली,शिवसेनेने आता ठोस भूमिका घेतली की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कोणतीही युती करणार नाही,तटकरे आणि त्यांच्या गटाने सातत्याने शिवसेनेच्या निर्णय क्षेत्रात हस्तक्षेप केला असून जिल्ह्यात आणि अंतर्गत गटबाजी घडवून आणली..या पार्श्वभूमीवर शिवसेना स्वतंत्र स्वबळावर तयारीत आहे…आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवून स्वतःचे वर्चस्व सिद्ध करून पाहत आहे…या घडामोडी पाहता स्थानिक आमदार महेंद्र थोरवे,महेंद्र दळवी त्यांची तर पूर्ण साथ लाभली आहे…त्यामुळे तेही रायगडच्या शिवसेनेचे मजबूत चेहरे बनले आहेत, त्यांचा राग तटकरेंकडे असल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतभेद पाहायला मिळते,ही संपूर्ण परिस्थिती पाहता खासदार सुनील तटकरे यांनी आपला जुना मित्र परत बोलवण्याचा चर्चा चालू आहे, हा मित्र म्हणजे शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकाप, एकेकाळी रायगडमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी हे गटबंधन होते दोघांनी सत्ता भोगली. काही काळातच राजकीय सत्तेमध्ये दोघांमध्ये अंतर निर्माण झाले , आज शेकापची स्थिती फारशी बळकट नाही ते अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे, महाविकास आघाडीत शेकापचा सहभाग असला तरी तो अंधनतरी आहे,एकीकडे काँग्रेसकडे प्रभावी नेतृत्वाचा अभाव आहे,आणि शरद पवार गटाला संख्याबळ आणि स्थानिक बळ मिळवण्यात अपयश आल आहे…त्यामुळे राजकारणात संधीला फार महत्त्वाचं असतं,आज ज्या गटाशी वैचारिक विरोध आहे त्याच गटाशी उद्या हात मिळवनि होऊ शकते…हेच तत्व लक्षात घेता राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे…तटकरे यांना माहिती आहे की गोगावले यांना रोखण्यासाठी मजबूत स्थानिक भागीदाराची गरज आहे…शेकापकडे गाव पातळीवर संघटना आहे, शेतकऱ्यांमध्ये संपर्क आहे आणि काही भागात आज त्यांची मोठ्या प्रमाणावर पकड आहे,राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र आले तर गोगावले यांना शिवसेनेसाठी मोठे आव्हान ठरू शकत,मत विभाजन होऊ शकतं, आणि रायगडमध्ये सत्ता समीकरणाचा नवा रंग भरला जाऊ शकतो,राजकीय इतिहासात अशा प्रकारचे अनेक प्रयोग झाले आहेत.हे दाखविले की स्थानिक राजकारणात वैचारिक किंवा राष्ट्रीय स्तरावरील मतभेद कमी महत्त्वाचे ठरतात,स्थानिक सत्तेचा लाभ,प्रभाव,विकास निधी, यांचा भाग वाटण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कोणाशीही हात मिळवणी करू शकतो, या माध्यमातून दिसून येतो…त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र आले,तर तो एक आश्चर्य वाटावा असा प्रकार नसेल उलट ही एक योजनाबद्ध रणनीती असेल जिचा उद्देश आहे तो म्हणजे गोगावले ना रोखणे, तटकरेंनी शेकापकडे हात पुढे केलाय…शेकाप तो स्वीकारेल का,आणि गोगावले यांच्याकडे या सर्वांना उत्तर देण्याची काय रणनीती असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…