स्व.प्रशांत पाटील यांचे कट्टर समर्थक दिपक माळी यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश…

0
40

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील) :-

उरणच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा स्वर्गीय प्रशांत भाऊ पाटील यांचे खंदे समर्थक श्री दिपक माळी यांनी त्यांच्या समर्थकांसह आज दिनांक २७ जुलै रोजी सुतारवाडी, माणगाव येथील जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला…. यापूर्वी स्वर्गीय प्रशांत पाटील (भाऊंच्या )अनेक सहकारी मंडळींनी पक्ष प्रवेश केला होता…. त्यावेळी उरण तालुक्यातील नागाव येथील स्वर्गीय प्रशांत पाटील यांचे डॅशिंग कार्यकर्ते हे बाहेरगावी होते त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश राहून गेला होता, तो आज दिनांक २७ जुलै रोजी प्रदेश अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे…. यावेळी तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकूर, मनोज भगत, वैजनाथ दादा ठाकूर, महिला तालुकाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. कुंदाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते अजित पाटील , तुषार ठाकूर, हंसराज चव्हाण आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते… स्वर्गीय प्रशांत भाऊ यांनी ज्या प्रकारे शरद पवार गट उरण तालुक्यात मजबूत होता, त्याप्रमाणे आत्ता अजित दादांच्या नेतृत्वाखाली असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढील काळात अगदी गावागावात पोहोचविण्यासाठी जबरदस्त मेहनत घेणार असल्याचे यावेळी दीपक माळी यांनी सांगितले… दिपक माळी यांच्यासारखा हाडाचा कार्यकर्ता पक्षाच्या मुळ प्रवाहात आल्याने त्याचा निश्चितच पक्ष वाढीसाठी फायदा होईल, असा विश्वास या निमित्ताने तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकूर यांनी बोलताना व्यक्त केला आहे….