नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील महिला मदत कक्षांसाठी ४० नवीन मोपेड दुचाकींचे वितरण ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, आडगाव येथे पार पडले.
या उपक्रमांतर्गत, निर्भया फंडातून प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून प्रत्येक महिला मदत कक्षाला स्वतंत्र दुचाकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांविरुद्ध गुन्ह्यांवर वेळीच प्रतिक्रिया देता यावी, गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे करता यावा आणि महिलांच्या समस्या तातडीने सोडवता याव्यात, यासाठी ही वाहने वापरण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस उपअधीक्षक नितीनकुमार गोकावे, राखीव पोलीस निरीक्षक पंडीत चव्हाण, मोटर परिवहन निरीक्षक अनिल घाडगे, तसेच महिला पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.महिला सुरक्षितता आणि सशक्तीकरण आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. या वाहनांच्या साहाय्याने महिला मदत कक्ष अधिक गतिमान होईल.