शेकापच्या जनसंपर्क कार्यालयाचे खारघरमध्ये उद्घाटन… माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते कार्यालयाचे लोकार्पण…

0
27

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (दिपक कांबळे):- 

खारघर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत,कोणाच्या काही अडचणी असल्यास त्या सोडवण्याकरिता प्रत्यक्ष भेट व्हावी याच अनुषंगाने रविवार दि. २७ जुलै रोजी शेतकरी कामगार पक्षाचे खारघर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले…खारघरमधील आरोग्य,दळणवळण,रोजगार,शिक्षण,पाण्याची व्यवस्था तसेच लोकाभिमुख सेवा या कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यालयाचे उदघाटन केले असल्याचे प्रतिपादन बाळाराम पाटील यांनी केले…शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती बिल्डर संतोष शेट्टी यांनी आपल्या सहकार्यासह शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला…शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला…यावेळी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले…शेतकरी कामगार पक्ष विकास करू शकतो… हा विचार मनात घेऊन असंख्य कार्यकर्ते शेकापमध्ये दाखल झाले आहेत… असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला …