नागपंचमी निमित्त आदर्श प्राथमिक शाळेत सर्प जनजागृती कार्यक्रम… विविध प्रकारच्या सर्पांची माहिती व मार्गदर्शन… 

0
22

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे) :-

मराठा विद्या प्रसारक संस्था संचलित आदर्श प्राथमिक शाळा, नांदगाव येथे नागपंचमी सणानिमित्त सर्प जनजागृतीचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…. विद्यार्थ्यांना सर्पांविषयी खरी माहिती देत त्यांच्या विषयी गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला….

या कार्यक्रमात सर्पमित्र प्रभाकर निकुंभ व त्यांच्या सहकारी ललित मोकळ, मंगेश आहेर तसेच वि.जे.एस.एस. ग्रुप, नांदगाव यांनी विविध प्रकारच्या सर्पांची माहिती दिली…. विषारी, अर्धविषारी व अविषारी साप कसे ओळखावे, असे साप आढळल्यास काय करावे, याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले….

मुख्याध्यापक अविनाश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात संजय जाधव यांनी नागपंचमी सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप शिरसाठ यांनी केले, तर यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले….

विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, अशा माहितीपूर्ण उपक्रमांमुळे भीती न ठेवता योग्य ज्ञान निर्माण होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले….