शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निदर्शने… कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवा…

0
20

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्रीपदावरून तात्काळ हटवा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत केली आहे. राज्याचे बेजबाबदार कृषीमंत्री शेतकऱ्यांना जुगार खेळायला लावतील.त्यांचा अशा वागण्याने राज्याची बदनामी होत आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची त्वरित मंत्री पदावरून हकालपट्टी करा अशा स्वरूपाचे पत्र मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले…