राजीव साबळे प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ‘ज्ञानदेव पोवार कार्ड’ चर्चेत!

0
20

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :- 

रायगड जिल्ह्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नवे समीकरण तयार होताना दिसत आहेत…. विशेषतः माणगावमध्ये माजी आमदार स्व. अशोक साबळे यांचे पुत्र अ‍ॅड. राजीव साबळे हे येत्या शनिवार, २ ऑगस्ट २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे…. मात्र, या प्रवेशाची खरी चर्चा राजीव साबळे यांच्या सहभागामुळे नव्हे, तर या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या एक व्यक्तिमत्त्वामुळे अधिक तापली आहे… ते म्हणजे दक्षिण रायगडचे वजनदार नेते ज्ञानदेव पोवार त्यामुळे राजीव साबळेंच्या प्रवेशाइतकीच उत्सुकता “पोवार कार्ड” ने काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….
“ग्रामीण भागाचा शिल्पकार” अशी ओळख असलेले ज्ञानदेव पोवार जे माजी राजीप सभापती, माणगाव नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १६ (खांदाड) चे विध्यमान नगरसेवक असून, त्यांनी काँग्रेस पक्षाच्या निशाणीवर निवडून येत संपूर्ण कोकणात काँग्रेसकडून नगराध्यक्ष होणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून इतिहास घडवला होता…. मात्र, त्या पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या माणगाव नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवणाऱ्या आघाडीचे नेतृत्व केले आणि सुनील तटकरे यांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात राजकीय संघर्षात आणले…. त्यामुळे पोवार यांना ‘तटकरेविरोधी’ ठाम भूमिका असलेले नेतृत्व म्हणून लोकांन मध्ये आहे.  दरम्यान, बदलत्या राजकीय वाऱ्यांसह कोण कुठल्या पक्षात आहे याची स्पष्टता निर्माण होत असली, तरी पोवार हे अद्याप नेमके कोणत्या पक्षात आहेत यावर सुस्पष्टता नसल्यामुळे, ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत…

आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधल्यावर पोवार यांनी केवळ, “बातमी आधी खात्रीशीर व्हू द्या, मग मी माझी भूमिका स्पष्ट करीन,” असे संक्षिप्त उत्तर दिले. त्यांच्या या मोजक्या शब्दांनी राजकीय उत्सुकता आणखी तीव्र झाली आहे…. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी महाडचे आमदार व राज्य मंत्री भारतशेत गोगावले यांनी माणगाव येथील पोवार यांच्या निवासस्थानी केलेली खासगी भेटदेखील चर्चेचा मुद्दा बनली आहे…. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे “ते अलिप्त राहणार”, कोणत्यातरी पक्षात जाणार की स्वतंत्र चकित करणारी भूमिका घेणार?

अशा स्थितीत, राजीव साबळे यांच्या प्रवेशाची पार्श्वभूमी “पोवार कार्ड” ला पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणते आहे… त्यांच्या शांततेत रणनीती लपली आहे की राजकारणात नवा भूकंप घडवण्याची तयारी? हे लवकरच स्पष्ट होईल…. पण तोपर्यंत रायगड जिल्ह्यात “पोवार काय करणार?” हाच सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे….