उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील) :-
कॉ.भूषण पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित नागरी गौरव सोहळा दिनांक ३१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता जेएनपीए टाऊनशिप मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न झाला… सदर प्रसंगी विश्वस्त गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले….
या कार्यक्रमास रायगड-नवी मुंबईतील समाजाचे बहुतांश नेते, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते…. त्यात माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा. आमदार जयंतभाई पाटील, मा. आमदार मनोहरशेठ भोईर, मा.आमदार बाळूशेठ पाटील, अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील उद्योगपती जे.एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्रशेठ घरत, जेएनपीएचे दोन्ही ट्रस्टी- दिनेश पाटील आणि रवि पाटील तसेच कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते डाॅ. डी. एल. कराड, काॅ टी. नरेंद्र राव यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी सुधाकर पाटील ((Ex IRS) होते….
काॅ भूषण पाटील हे अगदी सरळ- साधं व्यक्तिमत्व…. जवळ आलिशान गाडी नाही कि बंगला…. वावर नेहमी सर्वसामांन्याचा होता… ते २२ वर्षे जेएनपीटीचे ट्रस्टी राहिले, तेही निष्कलंक…. एकनिष्ठ आणि कडवे कम्युनिस्ट होते…. कामगार, सामाजिक क्षेत्रात सर्व विचारधारा सोबत घेऊन आणि सर्वांचा सन्मान आणि व्यापक दृष्टीकोन ठेवून काम करायचे, हे स्वागतार्ह तत्व त्यांनी सुरूवातीपासून अंगिकारले, म्हणूनच त्यांना समाजमान्यता मिळाली आणि या कार्यक्रमास दृष्ट लागावी असा प्रचंड प्रतिसाद लाभला…..
उरण-पूर्व विभागात २००६ साली एसईझेडचे संकट आले त्यावेळी त्यांनी या आंदोलनात स्वतःला झोकून दिले…. २१/०६/२००६ रोजी कम्युनिस्ट नेते सिताराम येच्युरी यांच्या नेतृत्वाखाली कोकण भवनवर पहिला मोर्चा धडकला त्यात ते अग्रभागी होते…. पुढे हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यासाठी काॅ भूषण यांनी येच्युरींसोबत यशस्वी पाठपुरावा केला…. उरण-पूर्व विभागातील आंदोलनात देखील ते सहभागी राहिले….