उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
करंजा प्रवासी जेटीवर गुरुवार दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अचानक पोलीस विभागाने “मॉक ड्रिल” हाती घेतल्यानंतर तीन तास प्रवासी बोटी बंद ठेवल्या गेल्या, यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली…
हवालदार सचिन पाटील यांना संपर्क साधला असता पोलीस कारवाईकडून स्पष्ट माहिती मिळाली की, हे ‘मॉक ड्रिल’ नौदल, पोलीस, अग्निशमन दल, अंमबुलन्स, फॉरेन्सिक टीम, स्थानिक डॉक्टर, स्थानिक पोलीस यांच्यात मोठ्या प्रमाणात समन्वय घडवून आणण्यासाठी होते…
या मॉकड्रिल दरम्यान बोटींसाठी बंदोबस्त लावण्यात आला होता… यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना होती, कारण त्यांना कामावर जायची वेळ होती… “हा काय मॉकड्रिल ? की आमच्यावर शॉक ड्रिल ?” असे संतप्त प्रवासी बोलून गेले… काहींनी या प्रकाराबाबत राज्यपालांकडे तक्रारही केली….
दोन सत्रांमध्ये झालेल्या या मॉकड्रिलमध्ये ‘बोट हायजॅक’ आणि ‘बॉम्ब स्फोट’ अशा घटनांची नोंद घेतली गेली… प्रवाशांनी विचारले, “या सर्वांची पूर्वकल्पना दिली गेली असती, तर आमचे नुकसान टळले असते… ”दहशतवादाचं सावट आहे, सज्ज राहणं गरजेचं आहे… पण त्यासाठी सामान्य नागरिकांना त्रास होणार असेल, तर हे ‘ड्रिल’ नव्हे त्रास सत्र आहे… यांचे दिलासा दायक आयोजन पोलीस, स्थानिक प्रशासन, नौदल, अग्निशमन, यंत्रणा यांच्यात स्पष्ट समन्वय, वेळेची सूचना, आणि सामान्य जनतेसाठी पर्यायी सुविधा आवश्यक करणे आवश्यक होते… अन्यथा अशा मॉक ड्रिलमुळे सामान्य नागरिकांच्या मनातच शॉक ड्रिल सुरू राहील…