नेरळच्या ग्रामपंचायत हद्दीतील तलावात तरंगत्या शवाने खळबळ… ८५ वर्षीय जनार्दन गायकवाड यांची आत्महत्या की घातपात?

0
3

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील तलावात रविवारी दि. (३ ऑगस्ट) दुपारी ८५ वर्षीय जनार्दन गायकवाड यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.स्थानिक ग्रामस्थांना तलावात शव तरंगताना दिसल्याने त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याला कळवले. ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश ईरमाले व इतर कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला.मृत व्यक्तीची ओळख राजबाग बिल्डिंग नं. १२ येथील रहिवासी जनार्दन गायकवाड अशी झाली असून, त्यांच्या अंगावर ‘चिक्की’ असे लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी, नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.मृतदेह विच्छेदनासाठी नेरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. ही आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.