सारा प्रॉडक्शनचे अध्यक्ष राजेश पाटील यांचा वाढदिवस वृद्धाश्रमांना टिव्ही संच, खेळाचे साहित्य, ब्लँकेट देऊन साजरा….

0
11

उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील) :-

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो,  आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करावा, जेणेकरून याचा गरीब गरजू लोकांना फायदा होईल…. याप्रमाणे सारा प्राँडक्शनचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त स्नेहकुंज वृद्धाश्रम नेरे पनवेल येथे ३२  इंच टिव्ही संच, ब्लँकेट, बेडशीट तसेच शांतीवन वृद्धाश्रम नेरे पनवेल व चिंचवली आश्रम नेरे पनवेल येथे ब्लँकेट, बेडशीट तसेच खेळाचे साहित्य वाटप करुन आपला वाढदिवस अनोखा उपक्रमातून साजरा केला आहे….

जसखार गावचे सुपुत्र तथा सारा प्राँडक्शनचे अध्यक्ष राजेश पाटील हे आपली आई कै.आशा पांडुरंग ( पी.जे.)पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अन्नदान तसेच गोर गरीबांसाठी जीवनावश्यक वस्तूचे वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी दरवर्षी आपली पत्नी सौ कांचन राजेश पाटील तसेच मुलगा समर्थ राजेश पाटील, मूलगी सारा राजेश पाटीलसह आपल्या कुटुंबासह पुढाकार घेत आहेत…. यावर्षी राजेश पाटील यांनी आपला वाढदिवस स्नेहकुंज वृद्धाश्रम नेरे पनवेल, शांतीवन वृद्धाश्रम नेरे पनवेल व चिंचवली आश्रम नेरे पनवेल येथे ३२ इंच टिव्ही संच ब्लँकेट, बेडशीट तसेच खेळाचे साहित्य वाटप करुन विद्यालयातील विद्यार्थी, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या उपस्थित गप्पा मारत आनंदी वातावरणात आपला वाढदिवस अनोखा उपक्रमातून साजरा केला आहे.यावेळी राजेश पाटील यांची पत्नी सौ कांचन राजेश पाटील, समर्थ राजेश पाटील सह कुटुंब उपस्थित होते….