माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके) :-
रायगड जिल्हा हा राजकीय दृष्ट्या केंद्रस्थानी असून, या जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदार संघातून आदिती तटकरे मंत्री आहेत तर महाड मधून भरत गोगावले मंत्री आहेत… आदिती तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आहेत आणि भरत गोगावले हे शिंदे गटाचे शिवसेनेचे मंत्री आहेत भरत गोगावले हे सत्ता परीवर्तन नंतर शिंदे गटात गेले आणि रायगड मध्ये वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नात आहेत, सुनील तटकरे हे लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत निवडून आलेले एकमेव खासदार आहेत आणि त्यांनी रायगड मतदार संघात राष्ट्रवादीचा झेंडा कायम ठेवला, एकीकडे पालकमंत्री पदावरून हा तिढा केवळ पदाचा नसून, राजकीय अस्मितेचा आहे, असं बोललं जातंय आणि दुसरीकडे शिंदे गटाचा आत्मविश्वास ठेवून उतरलेले पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आहेत… काही महिन्यापूर्वी पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि रायगड जिल्ह्यासाठी आदिती तटकरे यांचे पालकमंत्री पद जाहीर केलं होतं आणि भरत गोगावले यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पालकमंत्री पदाला शिवसेनेतर्फे विरोध दर्शवला आणि सरकारला काही वेळातच नियुक्ती मागे घेण्यात आली आणि आजतागायत रायगडचा पालकमंत्री पद अधिकृत जाहीर झालं नाही त्यामुळे येत्या 15 ऑगस्टला रायगडवर झेंडा कोण फडकवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे…