नागोठण्यात राख्या खरेदीसाठी बहिणींची झुंबड… वेगवेगळ्या नक्षीदार व रंगीबेरंगी राख्यानी नागोठणे बाजारपेठ सजली…

0
5

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-  

रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र व अतूट नात्याचे महत्व सांगणारा सण शनिवारी हा सण साजरा होतोय.रक्षाबंधनाला अवघे काहीच क्षण राहिल्याने नागोठणे पाली सह जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत.नागोठणे बाजार राख्यांनी फुलला आहे.पारंपरिक दुकानांसह शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकान सजली आहेत. लहान मुलांसाठी खास कलाकुसरीच्या राख्या बनवल्या आहेत. 20 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत राख्या विक्रीस आल्या असून राख्या खरेदीसाठी नागोठणे बाजारपेठेत  महिलांची एकच झुंबड पहावयास मिळतेय…