बनावट कागदपत्रे तयार करून केली भारत सरकारची फसवणूक… मुलीच्या एका चुकीमुळे फुटले नेपाळी दांपत्य यांचे बिंग…

0
3

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

भारत देशाचा नागरिक नसताना देखील शासनाचे अधिकृत कागदपत्रे बनावटरित्या तयार करून शासनाची विनय ध्रुव आचार्य (वय-५४ वर्षे, सध्या.रा. कल्पवृक्ष बंगला नागाव हटाळे, समध नगर, ता. अलिबाग जि. रायगड मुळ रा. कलैया नगरपालिका वॉड नं १० जि. देश नेपाळ.) ,विभा विनय आचार्य (वय ५० सध्या.रा.नेपाळ) या नेपाळी दांपत्यसहित अज्ञात इसम (नाव, पत्ता माहीती नाही) याने भारत सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात हर्षल सूर्यकांत पाटील (  वय-३५ वर्षे,  रा. अलिबाग ) यांनी दिली आहे.नेपाळी दांपत्य यांची मुलगी सलोनी हिने वडील विनय ध्रुव आचार्य व आई विभा विनय आचार्य यांचे नेपाळी रहिवाशी असलेले कागदपत्रे ठेवले होते.त्यामुळे आई वडील यांचे बिंग उघड झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून जवळपास दहा ते बारा किलो मीटर अंतरावर असणाऱ्या नागाव ग्राम पंचायत हद्दीतील हाटाळे येथे नेपाळी दांपत्य विनय ध्रुव आचार्य व विभा विनय आचार्य हे त्यांच्या कुटुंबासह भारत सरकारचे अधिकृत कागदपत्र हे अनधिकृत रित्या तयार करून सन २००७पासून राहत आहेत. नेपाळी दांपत्य विनय ध्रुव आचार्य व विभा विनय आचार्य  यांची मुलगी सलोनी श्रीराज दबे तिचे विवाहापूर्वी सलोनी आचार्य हीने भारतीय नागरिकत्व मिळण्याकरीता हिने भारतीय नागरिकत्वासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई येथे अर्ज केला होता. सलोनी विनय आचार्य हिने भारतीय नागरिकत्वसाठी जिल्हाधिकारी मुंबई येथे केलेल्या अर्ज हा चौकशी साठी  एफ.आर.आर.ओ.कार्यालय मुंबई यांचेकडे प्राप्त झाला होता. सदर त्यांचे अर्ज चौकशी दरम्यान सलोनी विनय आचार्य हिचे आईवडील हे नेपाळी नागरीक आहेत. हे तिच्याकडे असलेल्या नेपाळ सरकारच्या दस्तऐवजवरून निदर्शनास आले.

एफ. आर. आरओ ऑड कमिनशर ऑफ पोलीस स्पेशल बँद्र 2, सी. आय. डी मुंबई यांनी याबाबत अधिक कारवाई व चौकशी करण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार केले. त्यानंतर मा. पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय-रायगड यांनी सदरचे प्रकरण कायदेशिर कारवाईकरीता अलिबाग पोलीस ठाणे येथे पाठविले गेले.नेपाळी दांपत्य विनय ध्रुव आचार्य व विभा विनय आचार्य हे सध्या रायगड जिल्ह्यात रा. खारगल्ली, नागाव, ता. अलिबाग, येथे वास्तव्यास असून त्यांनी फसवणूक करून भारतीय कागदपत्र त्यात मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड काढल्याचे त्यांचे निदर्शनास आले.

नेपाळ येथे ध्रुव दांपत्य यांना काही काम मिळत नसल्याने कामाच्या शोधात ते महाराष्ट्रात आले काही काळ मुंबई येथील झोपडपट्टी येथे राहिले.त्यानंतर सन 2000 मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे नागाव  येथे येवुन भारतीय नागरिक असल्याचे सांगुन कासा लांबा या फार्म हाउस मध्ये केअर टेकर म्हणून काम मिळाल्याने सहपत्नी सोबत सदर फार्म हाउस मधील एका रूम मध्ये राहु लागले व तद्नंतर त्यांनी काही दिवसांनी सलोनी व तिची बहीण या दोन मुलींना नागाव येथे घेवून आले.त्यांचा मुलगा विश्वास आचार्य याचा अलिबाग येथील एका खासगी रुग्णालयात झाल्यानंतर नागाव बंदर रोड येथे स्वतःचे चायनिज कॉर्नर नावाने दुकान टाकले असल्याची माहिती समोर आली आहे.

विनय आचार्य आणि त्याचे कुटुंब हे जवळपास अठरा वर्षापासून ते आज पर्यंत  भारतातील महाराष्ट्रात विविध ठिकाणी राहुन नेपाळ या देशाचे नागरीक असताना ते भारतात आल्या बाबत कोणत्याही शासकीय यंत्रणेला माहीती न देता भारत सरकारची फसवणुक करीत भारतचे नागरिक आहोत हे सिदध करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे मतदान कार्ड महाराष्ट शासनाचे रेशनिंग कार्ड भारत सरकारचे पॅनकार्ड व आधारकार्ड बनावट कागदपत्रे सादर करुन ते बनवुन घेवुन त्याचा विविध ठिकाणी वापर करुन त्याआधारे मुलांचे देखील सर्व सरकारी कागदपत्र बनवुन शासनाची फसवणुक करुन केली आहे.

सदर प्रकरणाची चौकशी करून पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार हर्षल सुर्यकांत पाटील यांनी दिनांक 01/08/2025 रोजी बीएनएस कलम 318(2), 336, 340, 3 (5) अन्वये फिर्याद दिल्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक भुंडेरे हे करीत आहेत.