रायगड जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह… जीवना कोळीवाड्यात कोळी बांधवांकडून जय्यत तयारी…

0
12

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

नारळी पौर्णिमा म्हटली की या सणाची कोकणात जय्यत तयारी सुरू होते. 2 महिने बंद असलेली मासेमारी आणि समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या बोटी पुन्हा समुद्रात झेप घेण्यासाठी सज्ज असतात…या दिवशी कोळी समाज आपल्या विसावलेल्या बोटींना रंगकाम करून तिची पूजा करतात आणि दर्याला नारळ अर्पण करून या बोटी समुद्रात खेचतात.हा दिवस त्यांच्यासाठी दिवाळी पहाट सारखा मानला जातो..