कोल्हारेत २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू… जोत्स्ना विरले यांचा मानवतेचा उपक्रम…निशुल्क रुग्णवाहिका…

0
8

कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्त्या जोत्स्ना महेश विरले या नेहमीच चांगल्या कारणांनी चर्चेत असतात.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल येथील जनतेने वेळोवेळी घेतली असून आता त्यांच्या आणखी एका उपक्रमामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. अलीकडेच झालेल्या लोकार्पण सोहळ्यात जोत्स्ना विरले यांनी २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या सेवेअंतर्गत कोणताही टोल, पेट्रोल खर्च किंवा वाहन चालकाचे मानधन आकारले जाणार नाही. ग्रामपंचायत तसेच नेरळ परिसरातील आणि इतर कोणालाही रुग्णवाहिकेची गरज भासल्यास ही सेवा निशुल्क उपलब्ध राहणार आहे.या उपक्रमाबद्दल बोलताना काजल नवले यांनी, रुग्णवाहिका सुरू होण्यापूर्वी जोत्स्ना ताईंनी गरजू रुग्णांना दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लोकार्पण सोहळ्याला धामोते गावाचे सरपंच महेश विरले, रोशन मस्कर, पपेश विरले, भरत पेरणे, सोमनाथ विरले, मयूर पेरणे, बाळाराम पेरणे, जितेंद्र पेरणे, मारुती विरले, रवी विरले, जगन्नाथ विरले, विलास हजारे, दीपक घाटे, वैष्णवी म्हसकर, वंदना पेरणे, काजल नवले, साक्षी विरले, अस्मिता विरले, नूतन पेरणे, संगीता विरले, तुपे महाराज, गीता मोरे, सविता कोलंबे, नवनाथ बागडे, महेश हजारे, कृष्णा घाटे, कमलाकर विरले, धर्मा दळवी, दत्ता पगारे, बालाराम सरडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावकऱ्यांच्या मते, जोत्स्ना विरले यांची ही सेवा केवळ आरोग्य सुविधा नव्हे, तर मानवतेचे जिवंत उदाहरण आहे.मोफत रुग्णवाहिका साठी संपर्क क्रमांक:- नवनाथ बागडे 82375 15130,विलास हजारे 77750 20503,कृष्णा घाटे  91305 90883,भावेश 77759 91101परेश 770993 89790 संपर्क करावा…