दहा हजार बहिणींचं प्रेम;मंत्री भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी उसळली गर्दी… महाडमध्ये रक्षाबंधनाचा जल्लोष…हजारो बहिणींचा भावबंधाचा उत्सव…

0
8

रायगड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

महाड–पोलादपूर–माणगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली एक आगळी-वेगळी परंपरा आज पुन्हा अनुभवायला मिळाली. रक्षाबंधन सणाच्या आदल्या दिवशी मंत्री भरत गोगावले यांना बांधण्यासाठी मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील जवळपास १० ते १२ हजार बहिणी त्यांच्या निवास्थानी एकत्र आल्या.सुरुवातीच्या काळात मतदारसंघातील आदिवासी महिला मंत्री गोगावले यांना राखी बांधत असत. मात्र गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम महिला आघाडीच्या पुढाकाराने आयोजित केला जात आहे. त्यामुळे आता केवळ मतदारसंघातूनच नव्हे, तर जिल्ह्याच्या विविध भागांतून महिला येऊन आपल्या “भावाला” राखी बांधतात. या कार्यक्रमामुळे रक्षाबंधनाचा सण केवळ भावंडांच्या वैयक्तिक नात्यापुरता मर्यादित न राहता, सामाजिक ऐक्य आणि आत्मीयतेचा उत्सव ठरला आहे.