श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
मृत्यू हा कधी कोणत्या रूपात येईल याची कोणीही कल्पना करू शकणार नाही. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील दिघी येथे एका ए टी एम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय युवकाचा विद्युत झटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेल्या युवकाचे नाव भावेश नरेंद्र पोवळे (कुडगाव, तालुका श्रीवर्धन, रायगड) असे नाव आहे. याबाबत दिघी सागरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील तीस वर्षीय युवक भावेश नरेंद्र पोवळे हा रक्षाबंधन सण असल्याने दिनांक ८ऑगस्ट २०२५रोजी सायंकाळी पावणे सात ते सात वाजण्याच्या दरम्यान पैसे काढण्यासाठी दिघी येथे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या ए टी एम मध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता.भावेश नरेंद्र पोवळे याने ए टी एम चा दरवाजा उघडण्याकरता दरवाज्याच्या स्टीलचे हँडल पकडले असता त्यास जोरदार विद्युत प्रवाह बसला. ते जागीच कोसळले. स्थानिकांनी तात्काळ त्यांना दिघी येथील त्यास तेथे जमलेल्या लोकांनी प्रथम मोहसिन साळुंखे यांचे व नंतर बोर्लीपंचतन येथील डॉक्टर साळुंखे यांचे माऊली हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात हलवले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर गावात तसेच तालुक्यात शोककळा पसरली आहे. निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, एटीएम व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. विद्युत अपघातांमध्ये मृत व्यक्तीच्या वारसांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. पोवळे कुटुंबातील आई भावाचा एक आधार हरपला आहे. त्यामुळे मदतीची मागणी केली जात आहे.
या संदर्भात दिघी पोलिस ठाण्यात अनिता अनंत पिंपळे (वय 52 वर्ष रा. कुडगाव, ता. श्रीवर्धन, जि रायगड ) यांनी तक्रार दिली असून अ. मृ. नं. 12/2025 Bnss 194 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उप निरीक्षक शेख करीत आहेत.अशी माहिती दिघी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी आज सायंकाळी दिली आहे.