माणगाव टपाल कार्यालयाचा सर्व्हर ठप्प– नागरिक त्रस्त, तातडीने उपाययोजना करा…

0
14

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-  

गेल्या काही दिवसांपासून माणगाव टपाल कार्यालयाचा सर्व्हर वारंवार ठप्प होत असून, त्यामुळे नागरिकांची कामे ठप्प पडली आहेत.अनेकांना आपले काम न होता परत जावे लागत असून, वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.शनिवार,दि. ९ ऑगस्ट रोजी आमचे प्रतिनिधी परिस्थिती जाणून घेण्यासाठी माणगाव टपाल कार्यालयात गेले असता,येतील प्रमुख पोस्ट मास्तर यांनी सांगितले की गेल्या आठवड्यापासून प्रणाली अद्ययावत करून सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.तांत्रिक अडचणी असूनही प्रत्येक येणाऱ्या नागरिकाला मदत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान पायाने अधुरा असलेल्या प्रतिष्ठित नागरिक नथुराम पोवार (पोलीस पाटील, खांदाड) यांनी वारंवार ये-जा करावी लागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सर्व्हर बंद असल्याची सूचना देणारा फलक लावल्यास गावकऱ्यांचा सह शेतकरी यांचे फुकट प्रवास टळेल, अशी त्यांनी सूचना केली. दरम्यान आणखीन एक प्रतिष्ठित नागरिक यांनी वार्तालाप करताना सांगितले की दिलेली नोंदणीकृत मौल्यवान कागदपत्रांची टपाल पाकीट पुण्याला पोहोचण्याऐवजी आठवड्यानंतर परत माणगावला आले. नंतर शोध घेतल्यावर ते मुंबईच्या कार्यक्षेत्रात दाखवले गेले असल्याची खंत व्यक्त केली. या सततच्या सर्व्हर अडचणींमुळे केवळ नियमित टपाल व्यवहार ठप्प झाले नसून, माणगाव टपाल कार्यालयाच्या विश्वासार्हतेबाबत नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. माणगाव हे पोस्टल सेवांसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याने संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.