खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
वाहतूक कोडी नागरिकांची डोके दुःखी झाली आहे.रस्त्यावर बेशित वाहने पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीला सर्व सामान्य लोकांना त्रास होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे…
खालापूर नगरपंचायत हद्दीतील कोर्टासमोरील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी समस्या जैसे थे आज ही पहायला मिळत आहे.सदर रस्त्यावर आजपर्यंत वाहतूक कोंडी होतच होती.परंतु आता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुद्धा नागरिक आपली वाहने लावत आहेत.यामुळे खालापूरमधील नागरिक व शालेय विद्यार्थी यांना खूप त्रास होत आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी नगर पंचायत मध्ये अर्ज देऊन तसेच सामाजिक कार्यकर्ते उद्धव घोलप यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन करून सुद्धा यावर नगर पंचायत उपाययोजना करण्यात निष्क्रिय ठरत आहे.सत्ताधारी विकास कामात मग्न तर अधिकारी यांचा कुठे ठावठीकाणानाच नाही अशी सध्या तरी परिस्थिती दिसून येत आहे..नव्याने पदभार स्वीकारलेल्या मुख्याधिकारी तरी जनतेच्या समस्येकडे लक्ष देतील आणि नागरिकांच्या समस्या सोडवतील ही अपेक्षा आज नागरिक करत आहेत…