रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा… वादग्रस्त मंत्र्यांना हाकलण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी…

0
5

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-

राज्‍याच्‍या मंत्रीमंडळातील वादग्रस्‍त आणि भ्रष्‍ट मंत्र्यांच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्‍या वतीने रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला. वादग्रस्‍त मंत्री आणि सरकारच्‍या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्‍यात आली. वादग्रस्‍त मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळावे, वोटचोरी प्रकरणी निवडणूक आयोगाने तात्‍काळ कारवाई करावी, लाडकी बहीण योजनेतील गैरव्‍यवहाराची चौकशी करून गुन्‍हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्‍यात आली. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाल्‍याचे पहायला मिळाले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मात्र पोलीसांनी लावलेले बॅरीगेटस तोडून ते जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे सरसावले. सदर मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटवर पोलिसांनी मोर्चेकरांना अडवून धरले.त्यामुळे पोलीस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर मोठ्या पद्धतीने घोषणा सुरू झाल्या होत्या. या गेटवर ठाकरेंचे कार्यकर्ते मोठ मोठ्या आवाजात सरकार विरोधात घोषणा देताना पाहायला मिळाले. अखेर पोलिसांनी शिवसेना उबाठा गटाच्या शिष्टमंडळाला कार्यालयात सोडल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांना लेखी निवेदन देत आपला रोष व्यक्त केला.

यावेळी उपनेते बबन दादा पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत , माजी आमदार तथा उरण जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, तालुका प्रमुख संदीप तांडेल, सुनीत पाटील, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख रामदास गोवारी, शहर प्रमुख प्रदीप केणी, शहर प्रमुख प्रवीण जाधव, अक्षय साळुंखे, युवासेना जिल्हाधीकारी पराग मोहिते,माहिला आघाडी जिल्हा संघटिका  दिपश्री पोटफोडे, यांच्या सह शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…