कोकणातील तरुणांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करावे… लीलावती इन्स्टिट्यूट,रोहा येथे पोलीस उपाधीक्षक दौंडकरांचा विद्यार्थ्यांना सल्ला…

0
3

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रोहा तालुक्यातील वरसे येथे चंद्राबाई रामचंद्र कोंडे ट्रस्ट संचलित लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट विद्यालयाला रोहा पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौंडकर यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोकणातील तरुणांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.

संस्थेचे संस्थापक उदय कोंडे व शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी प्रतिभा उदय कोंडे यांनी दौंडकर यांचे स्वागत केले. उदय कोंडे यांनी सांगितले की, “बारावीनंतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी योग्य पर्याय मिळावा आणि विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सक्षम बनवावे, यासाठी हे विद्यालय सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत…

विद्यार्थ्यांना संबोधित करताना उपाधीक्षक दौंडकर म्हणाले, “आपल्या सुरक्षेची काळजी आपण स्वतः घ्यावी. पोलीस नेहमी सेवेसाठी तत्पर असतात, मात्र स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे.” त्यांनी चंद्राबाई कोंडे ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या हॉटेल मॅनेजमेंट विद्यालयात प्रवेश घ्यावा, असेही सांगितले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.