रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर अलिबाग शहरात वाहतूक ठप्प… सततच्या पावसाने अलिबाग जलमय,मुख्य रस्ते पाण्याखाली…

0
5

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.विशेषतः अलिबाग शहरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली आहे.अलिबाग एसटी स्टॅण्ड परिसर,बायपास रोड तसेच अलिबाग–वडखळ मार्गावरील सखल भागात पाणी साचले आहे.त्यामुळे वाहतुकीस मोठा फटका बसला असून, पाण्यातून जाणाऱ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात बिघाड होत आहेत.पावसामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी शाळा–व्यवसाय बंद ठेवावे लागत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.