सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर यांच्या वतीने प्राथमिक शाळा खालापूर येथे स्तुत्य उपक्रम…

0
4

खालापूर शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-  

सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग खालापूर यांच्यामार्फत ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राजिप शाळा खालापूर या ठिकाणी १३ ऑगस्ट चित्रकला स्पर्धा,१४  ऑगस्ट निबंध स्पर्धा व १५ ऑगस्ट २०२५  रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.चौक ग्रामीण रुग्णालयचे डॉ.राम शेट्टी,डॉ. ओव्हाळ मॅडम,डॉ.नूतन डॉ.मोहित  व त्यांचे सहकारी यांनी आरोग्य शिबीर यशस्वीपणे संपन्न केले.
सकाळी 9:30 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविल्याने पालकांनी सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले.कार्यक्रमाच  विशेष आकर्षण ठरले ते खालापूर तालुक्यातील कारगिल युद्धातील व १९७१ युद्धाचे युद्धवीर, माजी सैनिक मेजर प्रकाश महाडिक, मेजर बी एन भोसले, मेजर रमाकांत मोदी, मेजर शरद विचारे, मेजर शैलेश मंगले, मेजर भरत काकडे, मेजर सुरेश पिंगळे व मेजर नरेंद्र भोसले उपस्थित होते. मेजर प्रकाश महाडिक यांनी प्रत्यक्ष १९७१ च्या युध्दातील प्रसंग सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान उपविभागीय अभियंता मान प्रशांत राखाडे यांनी भूषवले. ह्या कार्यकारणासाठी  उमेश गावंड , सचिन ओसवाल,संजय वाडेकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नमिता सावंत,उपाध्यक्ष योगेश पवार,सदस्य मिलिंद भोसले ,रेश्मा पवार, सुजाता खरात,सलोनी कासार, स्मिता मानकामे ,पुष्पा पवार राजू मोरे , रुपेश चौधरी यांच्यासह विद्यार्थी व पालक  ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धक विद्यार्थ्यांचे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढून आकर्षक चषक व बक्षिस देण्यात आले. शाळेतील सर्व 84 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.मुलांसाठी कॅरम बोर्ड , बुद्धिबळ सेट देण्यात आला.शाळेसाठी ब्लुटूथ साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली.

कार्यक्रमाची संकल्पना सार्वजनिक खालापूरचे शाखा अभियंता सतीश गायकवाड यांची होती व ती यशस्वी करण्यासाठी शाखा अभियंता अक्षय केंजळे शाखा अभियंता,अजित महानूर सहाय्यक अभियंता,रेश्मा शिंदे कनिष्ठ अभियंता,विकास सुर्वे ,मनोज सोनवणे,युगल पवार, दौते मॅडम,प्रशांत वाघमारे, अरुण गोरे इतर कर्मचारी खालापूर शाळेचे  शाळाप्रमुख सचिन कडू,सारिका गोळे व मीनल धोत्रे यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला..शेवटी साहाय्यक अभियंता अजित महानूर यांनी आभार मानले.