कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित दहीहंडी उत्सव दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता रॉयल गार्डन शेजारी मैदान कर्जत रायगड येथे आयोजित करण्यात आला होता.
या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून दहीहंडी उत्सवानिमित्त आलेल्या गोविंदाशी संवाद साधला दहीहंडी उत्सव हा एकात्मतेचे प्रतीक आहे हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जातो. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गोविंदा पथकांसाठी विमा घोषित केला व प्रत्येक गोविंदाची काळजी घेण्याचा वचन दिले त्यामुळे हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे मी सर्व गोविंदां पदकांचे त्या निमित्ताने अभिनंदन करतो आपण हा जल्लोषपूर्ण थरार या ठिकाणी अनुभवत आहात व दहीहंडीला सलामी देत आहात. तसेच कर्जतकरांनी या दहीहंडी महोत्सवाला जी साथ दिली त्याबद्दल समस्त कर्जतकरांचे देखील अभिनंदन व आभार तसेच अजय पाल व विजय पाल यांच्यासह गुंडगे मधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे देखील पक्षात स्वागत केले व येणाऱ्या काळात कर्जतचे नंदनवन करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी एकजूट व्हायचंय व कर्जत नगरपालिकेवर देखील शिवसेनेचाच भगवा फडकवायचा आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना नगरसेवक ॲड. संकेत भासे यांनी दहीहंडी उत्सव हा सांस्कृतिक वारसा आहे आणि तो जपण्याचं भाग्य शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला लाभलं आहे. आमदार साहेबांच्या नेतृत्वात कर्जत शहराचा सर्वांगीण विकास होतो आहे. जसा दहीहंडी सणात खालच्या थरातील माणूस वरच्या थराला हात देतो, तशीच ताकद आपण सर्व शिलेदारांनी दिल्यास कर्जत शहराचा विकास नक्की साध्य होईल.
कर्जत शहरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, प्रभू श्रीराम व विठ्ठल मूर्ती ही आपली संस्कृती जपणारी प्रतीके आहेत. येत्या काळात पाणीपुरवठा, उड्डाणपूल, आरोग्य व नागरी सुविधा या प्रश्नांवर आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्ग निघेल, याचा मला विश्वास आहे.
या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी व गोविंदा पथकांचे,उपस्थित कर्जतकरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आदित्य साळुंखे डोंबिवली (प्रसिद्ध गायक) कश्मिरा कुलकर्णी (सिने अभिनेत्री) भाग्यश्री मोटे (सिने तारका)यांनी उपस्थिती लावली. या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने 31 मंडळांनी आपली सलामी पूर्ण केली या दहीहंडी उत्सवातील खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व मानाची दहीहंडी फ्रेंड्स गोविंदा पथक कळंबोली यांनी फोडली.
कर्जत तालुका मर्यादित मानाची दहीहंडी सलग तिसऱ्या वर्षी फोडण्याचा मान विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ या गोविंदा पथकाने पटकावला तसेच कर्जत शहर मर्यादित मानाची दहीहंडी जय अंबे भवानी जुनियर भिसेगाव या गोविंदा पथकाला मिळाला…याप्रसंगी पुरुष व महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ चे देखील आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांमध्ये ड्रॉ घेऊन सर्वांना बक्षीसाचे वाटप देखील करण्यात आले. या सोहळ्यासाठी रायगड शिवसेना पदाधिकारी,महिला आघाडी, युवा सेना कार्यकर्ते व असंख्य कर्जतकर उपस्थित होते.