स्वातंत्र्याचा अभिमान तिरंग्याची शान; माणगाव नगर पं.त ७९ वा दिवस साजरा…

0
5

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन माणगाव नगर पं. देशभक्तीच्या दणदणीत वातावरणात आणि सांस्कृतिक जल्लोषात उत्साहाने साजरा करण्यात आला. नगरपंचायत जलशुद्धीकरण केंद्र, उत्तेखोल येथील प्रांगणात आकर्षक सजावट जसे तिरंगा फुगे, फुलोऱ्यांनी, तिरंग्याच्या रंगांनी आणि विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती.

सकाळी ८.२० वाजता नगराध्यक्षा श्रीमती. शर्मिला शोभन सुरें यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तिरंगा फडकताच प्रांगणात “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या घोषणांनी गगनभरून निनाद केला. त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायले. पुढे महाराष्ट्राच्या अभिमानाचे गीत “जय जय महाराष्ट्र माझा” याची स्वरमधुर धून वाजवण्यात आली. यामुळे प्रांगणात देशभक्तीबरोबर प्रांतिक अभिमानाचेही रंग भरले.

उपस्थित नागरिक, नगरसेवक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा जाज्वल्य उत्साह दिसून आला. या प्रसंगी उपनगराध्यक्षा श्रीमती हर्षदा सतीश सोंडकर, मुख्याधिकारी संतोष माळी, सभापती कपिल गायकवाड, श्रीमती सुशीला शिवाजी वाढवल, श्रीमती नंदिनी नितीन बामगुडे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पोवार, आनंद यादव यांसह अनेक नगरसेवक, ज्येष्ठ नेते राजीव साबळे,  ज्येष्ठ पत्रकार रवींद्र क्वेस्कर, प्रमोद जाधव, उत्तम तांबे, मान्यवर, नगर पं. चे सर्व कार्यलीन अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शालेय शिक्षक वृंद, नगरपंचायतचे सर्व कर्मचारी, सफाई कामगार आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला विशेष आकर्षण ठरले ते शालेय विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांमुळे सजवलेले सादरीकरण प्रेक्षकांच्या डोळ्यात चमक आणणारे होते. विध्यार्थी चे तोंडी घुमणारी देशभक्तीपर वातावरण भारावून टाकले.  या दरम्यान कार्यक्रमाचे संयोजन नगर पं. चे सिटी को-ऑर्डिनेटर अतुल जाधव, अधिकारी व कर्मचारी यांनी मनापासून केले.  कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर, नागरिक व विद्यार्थी यांच्यासाठी नाश्ता व चहा देण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना व लहानग्या बालगोपाळांना गोडधोड मिठाईचे वाटप करून त्यांचा उत्साह दुपटीने वाढवण्यात आला. यावेळी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले, कारण संपूर्ण कर्मचाऱ्यांची टीम रात्रभर ते पहाटेपर्यंत सजावट व तयारीत गुंतलेली होती.

स्वातंत्र्यदिनाच्या या अविस्मरणीय सोहळ्यात माणगावकरांनी “स्वातंत्र्याचा अभिमान – तिरंग्याची शान” हा संदेश जगवला.