विमानतळाला दि. बा. पाटील नाव द्यावे – प्रकल्पग्रस्त ठाम… नांदगावात मानवी साखळी; शेतकऱ्यांचा इशारा…

0
3

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):- 

विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची जोरदार मागणी! पनवेल तालुक्यातील नांदगाव डोंगरावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मानवी साखळी उभारून ठाम संदेश दिला. जमीन दिली, पण योग्य मोबदला आणि रोजगार मिळालाच नाही! शेअर्स देण्याचे आश्वासन अजूनही हवेत!

प्रकल्पग्रस्तांनी सांगितलं की BVG, OCS, Adani सारख्या कंपन्या हक्कांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि सिडकोकडे प्रलंबित प्रश्नांवर अजून उत्तर नाही. या आंदोलनातून शेतकऱ्यांनी हक्कांसाठी लढण्याचा निर्धार दाखवला, आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी आणखी ठाम केली.