माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीनंतर ज्ञानदेव पोवार व संतोष माळी यांनी खांदाड प्रभाग क्र. १६ मधील पूरग्रस्त कुटुंबांना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भेट देऊन जलभरावाची पाहणी केली.
यावेळी युवक नेते महेश बाळा पवार (डी.जे.) देखील सोबत होते. तिघांनी मिळून गावातील स्मशानभूमी परिसरासह विविध भागांना भेट देत पाण्याने वेढलेल्या घरांची व ग्रामस्थांच्या अडचणींची माहिती घेतली. स्थानिक युवक व ग्रामस्थांनी यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यात – साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देणे, प्रभावित भागाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, डीडीटी व धूरफवारणी करून रोगराई टाळणे, नालेसफाई व नाल्याजवळ साचलेला कचरा हटवणे, मोर्बा रोडलगत झालेल्या मातीभरणामुळे वाढलेल्या बॅकवॉटरचा प्रश्न सोडवण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने नाले स्वच्छ करणे यांचा समावेश होता.
दरम्यान, आज दुपारी ४ वाजताजोरबा रोडवरील आदिवासी वसाहती परिसरात मोटारबोट हाताळणी व पुरग्रस्तांच्या बचाव कार्याचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिक युवकांना बचाव कार्याचे कौशल्य दिले जाणार आहे. श्री. पवार यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व खांदाडातील जलभरावाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.