मुंबई-गोवा महामार्गावर अडथळा दूर, माणगावजवळ वाहतूक सुरळीत… कळमजे नदीचे पूरपाणी उतरले महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू…

0
4

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-

गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गालाही बसला होता. माणगावजवळील कळमजे गावाशेजारील गोद नदीला पूर आल्याने या नदीवरील पुलावर पाणी चढले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस प्रशासनाने अवजड वाहनांना निजामपूर मार्गे वळविले, तर इतर वाहनांना पर्यायी मार्गाने सोडण्यात आले. मात्र आता नदीचे पाणी ओसरल्याने महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली आहे.