नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
मनमाडजवळील पानेवाडी स्थानकावर आज नवी दिल्ली-मुंबई राजधानी एक्सप्रेस अचानक थांबली असून प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. प्रेशर पाईप तुटल्याने गाडीचा प्रवास ठप्प झाला आहे.आधीच २० मिनिटांहून अधिक वेळ गेला आहे आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्याने प्रवाशी चिंतेत आहेत.रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असले तरी राजधानी एक्सप्रेस खोळंबल्याचा परिणाम मुंबईकडे धावणाऱ्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही होऊ शकतो.देशाच्या राजधानीला मुंबईशी जोडणारी ही महत्वाची रेल्वे सेवा रुळावर उभी राहिल्याने प्रवाशांचा तासन्तास खोळंबा होत आहे.हा प्रकार रेल्वेच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरतो आहे.