नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
मनमाड शहरातील मुख्य बस आगार प्रवाशांसाठी धोक्याचे ठिकाण ठरत आहे.गेल्या महिन्यात एका महिलेचा जीव घेणाऱ्या अपघातानंतर पुन्हा एकदा बस आगारात मोठी दुर्घटना घडली आहे. बस रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात लक्ष्मीबाई ताठे या महिलेचे दोन्ही पाय गमवावे लागले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.घटनास्थळी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.जखमीला तत्काळ तरुणांनी उचलून रुग्णालयात दाखल केले.स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला असून त्यांनी आगार व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की,बस आगारातील सुरक्षेच्या उपाययोजना फक्त कागदावरच आहेत.अपघातांचे प्रमाण वाढत असताना प्रवासी सुरक्षेकडे व्यवस्थापन डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे,अशी तीव्र टीका नागरिकांनी केली आहे.