पनवेलमधील गौरी आगमन आणि विसर्जन सोहळा मोठ्या थाटात…

0
3

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-

पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील यांच्या घरी गौराईचे आगमन झाले.आणि पूजन करण्यात आले.गौराईच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांनी एक सप्टेंबर रोजी गर्दी केली होती.यात राजकारणी,सामाजिक,शैक्षणिक,पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे, रविवारी ज्येष्ठा कनिष्ठा गौरीच मोठ्या थाटात घरोघरी आगमन झाले. घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून तिला घरात आणली. यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली.
शालू,पैठणी नेसून गौरीला सजवण्यात येते…दागदागिने घालून या महालक्ष्मीचा शृंगार केलेला असतो. मराठी पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध अनुराधा नक्षत्रावर षष्ठीला आगमन आवाहन झाले. सप्तमीला पूजन झाले आणि आज अष्टमीला विसर्जन होणार आहे.माहेरपणाला आलेल्या गौराईंचा पाहुणचार थाटामाटात केला जातो. गौराई जेवणाच्या दिवशी पंचपक्वान्नांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. त्यानंतर गौरी विसर्जनाच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून गौरीला निरोप दिला जातो.
गौरीचे ३१ ऑगस्ट रोजी आगमन झाले.1 सप्टेंबर रोजी गौरीपूजन झाले आणि आज २ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. यादिवशी गौरीला निरोप दिला जातो.दोन दिवसांच्या माहेरपणानंतर तिसऱ्या दिवशी गौराईला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला जातो. यंदाच्या गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त हा रात्री ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत आहे. या वेळेच्या आधी गौरी विसर्जन करू शकतो.