गणेशोत्सवाच्या उत्साहात श्री सत्यनारायणाची महापूजा भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग…

0
1

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल ):-

पनवेल तालुक्यातील आदई गावात गणेशोत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक वातावरण रंगात आले आहे.याच पार्श्वभूमीवर रमाकांत हाशा गरुडे (मा. सरपंच – आदई-नेवळी ग्रामपंचायत, माजी संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल) यांच्या वैभव निवास येथे गुरुवार दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली… गणेशोत्सवात दरवर्षी आयोजित होणारी ही महापूजा गावातील धार्मिक आणि सामाजिक एकोपााचे प्रतीक मानली जाते.संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे.महापूजेचा धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना प्रसादाचा लाभ घेण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.गावकऱ्यांचा विश्वास आहे की,गणेशोत्सवाच्या काळात श्री सत्यनारायणाची महापूजा घराघरात सुख-समृद्धी आणते.या निमित्ताने कुटुंब, नातेवाईक, तसेच सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन गावातील ऐक्य दृढ करतात.ही महापूजा आदई गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे असलेल्या वैभव निवास येथे होणार आहे.आदई गाव व परिसरातील नागरिकांमध्ये या महापूजेबद्दल मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे. गणेशोत्सवाच्या आनंदसोहळ्यातील ही महापूजा भाविकांसाठी आध्यात्मिक उर्जेचा अनुभव ठरणार आहे.