नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
नेरळ भागात मिनी पाकिस्तान?होत आहे असा गंभीर आरोप एका व्हिडिओद्वारे व काही प्रसार माध्यमातून करण्यात आला असून,यामुळे स्थानिक पातळीवर सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी वकील सुमित साबळे, आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष,यांनी केली आहे…
एका व्हिडिओमध्ये नेरळ व कर्जत परिसरात विशेष धार्मिक समुदायासाठी ‘हलाल लाईफस्टाईल’वर आधारित सोसायट्यांची निर्मिती होत असल्याचा दावा करत हा भाग मिनी पाकिस्तान होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे.हे वक्तव्य अत्यंत भडकाऊ असून, त्यातून समाजात द्वेष आणि फुटीरता पसरवण्याचा उद्देश असल्याचा आरोप केला जात आहे.