माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर शहरात शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री अंदाजे एक वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत बाजारपेठेत काही वेळातच एकच गोंधळ उडाला. या आगीत मेडिकल शॉप, नोवेल्टी जनरल स्टोअर आणि स्वीट मार्ट ही तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आग इतकी मोठी होती की काही मिनिटांतच तिन्ही दुकानांचा माल भस्मसात झाला.आगीमुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या इंदापूर बाजारपेठेत नेहमीप्रमाणे गजबज असते. मात्र रात्रीच्या वेळी अचानक पेटलेल्या या आगीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धावपळ करत आग विझवण्याचा प्रयत्न केला.