मोरबे धरणाच्या काठावरील घरे,बंगले जमीनदोस्त करा, मंत्री गणेश नाईक…

0
1

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

मोरबे धरणाच्या काठावरील घरे,बंगले यांना मोबदला देऊन ते जमीनदोस्त करा, जेणेकरून या वास्तूंचे सांडपाणी धरणात येणार नाही, पाणी दूषित होणार नाही याची दक्षता मोरबे धरण प्रशासनाने घ्यावी, असे परखड मत वन मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई महानगर पालिका यांना पाणी पुरवठा करणारे मोरबे धरणाचे जल पूजन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रथम महापौर व माजी खासदार संजीव नाईक,माजी महापौर सागर नाईक व नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे उपस्थित होते.यावेळी आयुक्त कैलास शिंदे व माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते पूजा करण्यात आले.रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, नवी मुंबई महानगर पालिका यांची हद्द व पनवेल महानगर पालिका यांच्या खारघर व कामोठे विभागाला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण हे नवी मुंबई महानगर पालिका यांच्या मालकीचे आहे.दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले की नवी मुंबई महानगर पालिका पाणी पुरवठा विभाग यांच्या वतीने जल पूजन करण्यात येते. यावर्षी २० ऑगस्ट २०२५ रोजी मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले.गेल्या वर्षी २९ ऑगस्ट रोजी जल पूजन करण्यात आले होते.नवी मुंबई महानगर पालिका हद्दीतील सर्व जनतेस स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा होणे क्रमप्राप्त आहे, यासाठी नवी मुंबईकर यांच्या आरोग्याशी खेळ नको,त्यामुळे पूर्ण धरणाला कुंपण घालण्यात यावे, धरणाच्या काठावरील घरे बंगले व अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावे असे स्पष्ट निर्देश दिले, हे झाले नाही तर मी स्वतः तक्रार करीन असे सांगून अधिकारी व प्रशासनाने प्रामाणिक कर्तव्य बजावून जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करावा असेही मंत्री गणेश नाईक यांनी आवाहन केले. यावेळी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये मोरबे धरणाची, होणाऱ्या पाणी पुरवठा व येणाऱ्या अडचणी सांगून सर्व विभागाला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न याची माहिती दिली. यावेळी पाणी पुरवठा विभागात चांगले काम केले त्यांचा सत्कार मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमानंतर मंत्री गणेश नाईक यांनी धरण परिसराची पाहणी केली.यावेळी माजी नगरसेवक जयाजी नाथ, रविंद्र इथापे, सौ.शिर्के,अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त गेठे,शहर अभियंता शिरीष आदरवाद,अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे,कार्यकारी अभियंता मोरबे वसंत पडघम, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा शंकर जाधव, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, सरपंच सुहास कदम, माजी सरपंच सचिन मते,राहुल मोरे यांच्यासह नवी मुंबई महानगर पालिका माजी नगरसेवक,अधिकारी,कर्मचारी, मोरबे धरण कर्मचारी उपस्थित होते.