मेडिकल,जनरल स्टोअर,स्वीट मार्ट एका क्षणात राख इंदापूरकर थरारले… तिन्ही दुकाने जळून खाक…लाखोंचा व्यापार उद्ध्वस्त…

0
5

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

इंदापूर शहरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली… शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास एकच अग्नि तांडव झाल्याचे पाहायला मिळाले… यामध्ये मेडिकल शॉप, नोवेल्टी जनरल शॉप, स्वीट मार्ट अशा तीन दुकानाला भीषण आग लागून आगीमध्ये तिन्ही दुकान जळून खाक झाली… या तिन्ही दुकानांमध्ये लाखोचं नुकसान झाले आहे.मुंबई गोवा महामार्गाच्या ठिकाणी इंदापूर बाजारपेठमध्ये भर वर्दळीत एकच अग्नितांडव झाल्याने एकच खळबळ उडाली, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही… मात्र व्यावसायिकांचं अतोनात नुकसान झालं, ही आग शॉर्टसर्किटमुळे झाल्याची स्थानिकांकडून माहिती मिळाली आहे…