माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
माणगाव तालुक्यात गायींची विनापरवाना वाहतूक करणारी घटना उघडकीस आली आहे.दिघी–पुणे हायवेवरून धडाक्यात जात असलेल्या पाच बोलेरो पिकअप गाड्यांमध्ये कोंबून भरलेल्या गाई पकडताच परिसरात एकच खळबळ उडाली.अमित कॉम्प्लेक्सजवळ सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे ही मोठी कारवाई घडली. संशयास्पद हालचाल दिसताच कार्यकर्त्यांनी थरारक पाठलाग करत गाड्या रोखल्या आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्या.कोंबून भरलेल्या गाईंना थेट मृत्यूच्या दारातून जीवदान मिळाले. या प्रकरणानंतर नागरिकांचा रोष उसळला असून गायींना छळणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या, गुन्हेगारांना सोडू नका अशी जोरदार मागणी होत आहे.पोलिसांनी गाड्या जप्त केल्या असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.माणगावात या घटनेमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.