पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
मौजे पाथरूड,तालुका भूम,जिल्हा धाराशिव येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे भयानक पूरपरिस्थिती निर्माण झाली.या पुरामुळे गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शेती, घरेदारे,गुरेढोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.अन्नधान्याचीही तीव्र टंचाई जाणवत आहे… या गंभीर परिस्थितीत ग्रामस्थ मंडळ सुखापुर (पनवेल) आणि मित्रपरिवार धाराशिवकरांसाठी तात्काळ मदतीला धावून आले.पुरग्रस्तांसाठी अन्न,पिण्याचे पाणी आणि आवश्यक वस्तूंची प्राथमिक मदत पुरविण्यात आली.
यात तांदूळ,तूरडाळ,वाटाणा,तेल,साखर, साबण, कोलगेट, मेणबत्ती यांसह कपडे, साड्या आदी वस्त्रसामग्रीचेही वाटप करण्यात आले. या मदतकार्यात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये राजेश केणी, संदीप म्हसकर, स्वप्नील भुजंग, अनिल म्हात्रे, चैतन्य मनोरे, धनंजय पाटील, संदीप तांडेल यांचे मोलाचे योगदान राहिले.मानवी जीवनाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सुखापुर ग्रामस्थ मंडळ व मित्रपरिवाराने केलेले हे कार्य पुरग्रस्तांसाठी दिलासा ठरले आहे.

