रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
मोहोपाडा बाजारपेठेतील भाजी विक्रेते,फळ विक्रेते, फेरीवाले व छोटे मोठे उद्योग व्यवसायिक सायंकाळी आपला कचरा मोहोपाडा येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल कुसुमच्या शेजारी असलेल्या मुतारीच्या बाजूला बिनधास्तपणे टाकतात. रस्त्यावर कचरा टाकताना त्यांना कुणाचीही व कुठल्याही प्रकारची भीती उरलेली नाही त्यामुळे मुख्य रस्त्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येते या परिसरातील मोकाट गुरे, कुत्रे,सदर ठिकाणी येऊन गर्दी करतात या घाणीच्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण असल्याने घातक वस्तुंमुळे गुरांच्याही आरोग्याला आणि जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रतिनिधींच्या बोलतांना व्यक्त केली आहे.