गणेश नगर येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

0
17

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

              श्री.वरदविनायक मंदिर ट्रस्ट गणेश नगर रिस येथे सालाबाद प्रमाणे यांनाही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.गणेश नगर येथील श्री. वरद विनायक मंदिर येथे शारदीय नवरात्र आणि दसरा गेली २५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे रौप्यमहोत्सव दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साही व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.दीपक परशुराम कांबळी यांच्यातर्फे पैठणी देण्यात आली.प्रदीप कदम यांनी पैठणी महिला मुलांसाठी खेळ आणि करमणुकीचे कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र मुंढे. उपाध्यक्ष,सेक्रेटरी, खजिनदार व सर्व आजी-माजी पदाधिकारी महिला सदस्य यांनी विशेष मेहनत घेऊन हा नवरात्रोत्सव चांगल्या प्रकारे साजरा केला दसऱ्याच्या दिवशी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी तसेच मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.उमाताई मुंढे मा.सरपंच संदीप मुंढे. मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक परशुराम कांबळी,गणेश गायकवाड,यश कुल्ले, मधुकर जांभळे,विजय चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.गणेश नगर मधील सर्व रहिवाशी अबालवृद्धांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.