खारघर विभागाला नवी ताकद!सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे भव्य उद्घाटन… खारघर विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय सुरू नागरिकांच्या सुरक्षेला नवे बळ…

0
17

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):- 

सहाय्यक पोलीस आयुक्त, खारघर विभाग, नवी मुंबई कार्यालयाचे उद्घाटन आज दि.3 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत महाराष्ट्र राज्य, शासन निर्णय क्रमांक एपीओ/3525/प्र.क्र.58/पोल-3. दिनांक 23/07/2025 अन्वये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 व 2 यांची पुनर्रचना करुन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 वाशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 बेलापूर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3 पनवेल असे तीन परिमंडळ निर्माण करण्यात आलेले आहेत. तसेच सदर परिमंडळ 3 मध्ये सहायक पोलीस आयुक्त, खारघर विभाग हे पद नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे. खारघर विभागाअंतर्गत खारघर, कामोठे, कळंबोली व तळोजा अशी 4 पोलीस स्टेशनची हद्द निश्‍चित करण्यात आलेली आहे. खारघर विभागाचा कार्यभार श्री. विक्रम कदम, सहायक पोलीस आयुक्त यांनी दिनांक 01/08/2025 रोजी स्विकारला आहे.

सहायक पोलीस आयुक्त, खारघर विभाग यांचे कार्यालय हे खारघर पोलीस स्टेशनच्या पहिला मजल्यावर कार्यान्वीत करण्यात आलेले आहे.सदर कार्यालयाचे उद्घाटन मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे शुभ हस्ते व संजय येनपूरे, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई यांच्या उपस्थितीत दिनांक 03/10/2025 रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न झाले आहे. तरी नागरीकांनी त्यांचे समस्यांबाबत सहायक पोलीस आयुक्त, खारघर विभाग या कार्यालयात संपर्क करण्याबाबत आवाहन करण्यात करण्यात येत आहे.