कुणाल नीरभवणे यांच्या नेतृत्वाखाली सीवूड्समध्ये माऊलीच्या भक्तीचा उत्सव… ढोल-ताशांच्या गजरात सीवूड्सच्या माऊलीला निरोप…

0
12

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

सीवूड्स माऊली सार्वजनिक नवरात्र मंडळाने यंदाचा नवरात्रोत्सव उत्साह, आनंद आणि एकतेच्या वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरा केला. मंडळाचे संस्थापक कुणाल नीरभवणे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव भक्ती, संस्कृती आणि सामुदायिक भावनेचा अनोखा मेळ ठरला.दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांसाठी खास रचण्यात आला होता. रास-गरबा, नृत्य, गाणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. रंगीबेरंगी वेशभूषेत तरुणांनी केलेल्या सहभागामुळे नवरात्रीची शोभा अधिक खुलली.दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, नऊ दिवस सेवा केलेल्या माऊलीचे ढोल-ताशांच्या गजरात भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. यावेळी मंडळातील महिलांनी नृत्याचा ठेका धरत भक्तिभावाने माऊलीला निरोप दिला. विसर्जनस्थळी माध्यमांशी बोलताना मंडळातील महिलांनी सांगितले…कुणालदादांनी यंदा खूप छान पुण्याचं काम केलं. आमच्या विभागात पूर्वी कोणतेच कार्यक्रम होत नव्हते, पण दादांच्या प्रयत्नांमुळे आता सगळे एकत्र साजरे करतो. यंदाची नवरात्री अप्रतिम झाली. विसर्जनाला माणसांची प्रचंड गर्दी होती…सर्व बेधुंद होऊन नाचत, आनंद घेत होते. कुणालदादांच्या हातून असेच सत्कर्म दरवर्षी घडावं हीच आमची इच्छा आहे.त्यांनी पुढे सांगितले…येत्या निवडणुकीत कुणालदादा आमचे नगरसेवक व्हावेत, हीच माऊली चरणी आमची प्रार्थना आहे… जेणेकरून दरवर्षी सण सोहळे आणि आमच्या सगळ्या इच्छा कुणालदादांच्या माध्यमातून पूर्ण होतील…

यावर्षीची नवरात्री नावाजण्याजोगी आणि मनात घर करणारी ठरली. आज माऊलीचं विसर्जन होत असताना वातावरण भक्ती, आनंद आणि उत्साहानं ओथंबून गेलं होतं. विसर्जनाच्या मिरवणुकीला प्रचंड गर्दी होती…ढोल-ताशांच्या गजरात, माऊलीच्या जयघोषात सर्वजण बेधुंद होऊन नाचत होते,आनंदाच्या लहरींमध्ये प्रत्येकाचं मन न्हाऊन निघालं होतं…माऊलीला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी, पण ओठांवर फक्त एकच शब्द सीवूड्सच्या माऊलीचा उदय असो….