रसायनी कराडे येथील अतिरिक्त एमआयडीसी मधील इस्कॉन कंपनी मध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस…

0
17

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :- 

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे कराडे गावाच्या हद्दीत असलेल्या अतिरिक्त एमआयडीसीत इस्कॉन कंपनीमध्ये २० मार्च २०२५रोजी कंपनीच्या आवारात घुसून अज्ञात चोरट्यांनी ५३ हजार ५०० रुपये किमतीची वायर व पाईप चोरी केली होती.याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात२० मार्च २०२५ रोजी ७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ प्रमाणे सदर चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.सदर चोरीला गेलेला माल व आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली होती.जवळपास सहा ते सात महिने उलटून गेल्यानंतर या तपासाची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारांमार्फत खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने  चोरीतील विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी इस्कॉन कंपनीत चोरी केली असल्याची कबुली त्यांच्या पालकांच्या समक्ष दिली.चोरी करणारे हे अल्पवयीन(विधी संघर्षित) बालक असून त्यांना ३ऑक्टोबर २०२५ रोजी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे… सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे,यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उप निरीक्षक लिंगप्पा सरगर,सहाय्यक फौजदार संदीप पाटील,प्रसाद पाटील, पोलीस हवालदार सुधीर मोरे,रवींद्र मुंडे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.