गावच्या तरुणांना नोकरी नाही काराव ग्रामपंचायत सदस्यांचे बेमुदत उपोषण सुरू… काराव ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांना जेएसडब्लू कंपनीत सामावून घेण्याची मागणी… 

0
19

पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदीप मोकल):- 

पेण तालुक्यातील काराव ग्रामपंचायत हद्दीतील सुशिक्षित तरुणांना जेएसडब्लू कंपनीत नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश म्हात्रे, सदस्या भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, दिपाली भोईर, मुक्ता वाघमारे तसेच ग्रामस्थ रांजेंद्र कडू आणि अंकुश वाघमारे यांनी सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ पासून काराव-गडब ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.      आज उपोषणाचा पाचवा दिवस असूनही उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधीपासून वंचित ठेवले जात असल्याने ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.दरम्यान, उपोषणस्थळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी भेट देऊन कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.         कंपनीचे उपस्थित अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा करून ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.कंपनीकडून ठोस निर्णय झाल्यास आम्ही उपोषण मागे घेऊ,असे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.