१ लाख २० हजार रुपये किमतीचा गांजा अवैद्यपणे विक्री करणाऱ्यां दोन युवकांना पोलिसांनी केले जेरबंद…

0
10

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):- 

रायगड जिल्ह्यात अवैद्य धंद्यांना बीमोड करण्यासाठी व त्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलत अशा अवैद्य धंद्यांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा जिल्ह्यामध्ये सज्ज झाली आहे.रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक लेडी सिंघम श्रीमती आंचल दलाल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैधरित्या धंदे करणाऱ्यांना चांगली चपराक बसली असुन जिल्ह्यात काही ठिकाणी अवैद्यरित्या धंदा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.

दि. ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी अलिबाग रायगड येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक फौजदार संदीप पाटील  यांना गोपनीय बातमी मिळाली की, दोन इसम स्कुटीवर गांजा विक्री करण्यासाठी मुंबई पुणे जुना हायवे घोडीवली फाटा येथे एका बंद पेट्रोल पंपामध्ये येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर सदरची माहिती  स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस  निरीक्षक श्री मिलिंद खोपडे यांना देऊन ,खालापूर पोलीस निरीक्षक श्री सचिन पवार यांची मदत घेऊन स्टाफसह पोलीसांनी त्या ठिकाणी सापळा रचला.याच दरम्यान दोघेजण स्कुटी घेऊन आल्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता व गाडीची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातील ‌स्कुटीमध्ये ३.३८३ किलोग्रॅम वजनाचा १,२०,०००/-रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला तसेच आरोपीत यांनी वापरलेल्या २,००,०००/-किमतीच्या दोन्ही स्कुटी जप्त करण्यात आले आहेत विवेक विश्वनाथ गायकवाड वय (२२) राहणार शेडवली तालुका खालापूर व सुदर्शन वसंत सावंत वय (३२) राहणार यशवंत नगर खोपोली ह्या दोघांना ताब्यात घेतले असून यांच्यावर ३४०/२०२५ एनडीपीएस अधिनियम १९८५ चे कलम ८(क),२०(ब)ii २९ अन्वये नोंद करण्यात असून त्यांना १३ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल मेहुल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे, मोहन बहाडकर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील, मोहन भालेराव, पोलीस हवलदार बाळा जाधव, विशाल शिंदे,देवेंद्र शिनगारे, शेखर मोरे चालक संदेश कावजी हे तपास करीत आहेत