पाच लाखाची लाच घेताना विशाल वाघाटे रंगेहात पकडलं… रायगडमधील पोलीस हवालदार ACB च्या जाळ्यात…  

0
8

 माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-

रायगडमधील महाड येथे पोलीस हवालदार विशाल वाघाटे याला लाच घेताना अँटी करप्शनने पकडले… अलिबाग पोलिस ठाण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अँटी करप्शन विभागाने एका पोलीस हवालदाराला पाच लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून रंगेहात अटक केली आहे.आरोपीचे नाव विशाल वाघाटे असे असून तो अलिबाग पोलिस मुख्यालयात कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित हवालदाराने एका POCSO कायद्यान्वये नोंदवलेल्या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने त्वरित ही बाब रायगड अँटी करप्शन विभागाच्या निदर्शनास आणली.त्यानंतर ACB पथकाने जाळं तयार करून सापळा रचला.

याच दरम्यान,आरोपीने पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपये स्वीकारताना त्याला ACB पथकाने रंगेहाथ पकडलं.या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.ACB च्या तपासात आरोपीच्या आणखी गैरव्यवहारांची चौकशी सुरू असून त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

अँटी करप्शन विभागाचे अधिकारी सांगतात की,पोलीस दलातील कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने भ्रष्टाचार केल्यास त्याला कायद्यापासून सूट मिळणार नाही. कोणालाही दबावाखाली लाच देण्याची गरज नाही; नागरिकांनी तत्काळ ACB ला माहिती द्यावी.या घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्याचं हे वर्तन समाजात नकारात्मक संदेश देणारं ठरलं