उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण पंचायत समितीच्या आठ गणांच्या आणि चार जिल्हा परिषद (जि.प.) गटांच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. पंचायत गणांच्या आरक्षणासाठीची विशेष सभा आज, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समिती सभागृहात अश्विनकुमार सोनुने,उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आणि उद्धव कदम, तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या आरक्षण सोडतीमुळे तालुका तसेच जिल्हा स्तरावरील राजकीय समीकरणे निश्चित झाली आहेत.
पंचायत समितीच्या आठ गणांसाठी जाहीर झालेले आरक्षण खालीलप्रमाणे:
प्रभाग क्र. गणाचे नाव आरक्षणाचा प्रवर्ग
५४ चिरले नामप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग) – स्त्री राखीव
५१ नवघर नामप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग) – सर्वसाधारण
५३ जासई सर्वसाधारण – स्त्री राखीव
५७ चिरनेर सर्वसाधारण – स्त्री राखीव
५८ आवारे सर्वसाधारण – स्त्री राखीव
५२ भेंडखळ सर्वसाधारण
५५ केगाव सर्वसाधारण
५६ चाणजे सर्वसाधारण
यासोबतच, तालुक्यातील महत्त्वाच्या जिल्हा परिषद गटांचे आरक्षणही निश्चित करण्यात आले. त्याचे तपशील पुढीलप्रमाणे:
जिल्हा परिषद गट आरक्षणाचा प्रवर्ग
चिरनेर नामप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
नवघर सर्वसाधारण स्त्री
चाणजे सर्वसाधारण स्त्री
जासई नामप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
आरक्षण निश्चित होताच,तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून,पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आता मोर्चेबांधणी आणि जनसंपर्कावर लक्ष केंद्रित केले आहे.